• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

editor desk by editor desk
January 15, 2025
in जळगाव, राज्य
0
जळगावात दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा मुदतबाहय साठा नष्ट ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जळगाव : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृति आराखडा घोषीत केल्याच्या त्याअनुषंगाने अन्न्‍ सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 13 जानेवारी, 2025 रोजी दुरदृश्र्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत अन्न व्यसायिकांचे परवाना/नोंदणी, धडक मोहिम, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने, Fostac Training , Hygiene Rating, Eat Right Campus यांचे कामकाज प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

तसेच, भेसळ रोखण्याकरिता व राज्यातील जनतेस उपलब्ध होणा-या दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगे संपूर्ण राज्यात दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थांची सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. 100 दिवसांचा कृति आराखडा अंतर्गत प्रशासनाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व नमुने विश्लेषणासाठी घेण्याची विशेष मोहिम हाती घेतलेली आहे.

त्याअनुषंगाने जळगाव जिल्हयात आज दिनांक 15 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवली. यात विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण 14 नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले. त्यासमवेत मे. रविराज एजन्सी, विसनजी नगर, जळगाव यांच्याकडे दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थाचा सुमारे रु. 4095/- रुपयांचा साठा हा मुदतबाहय असल्याचा आढळून आल्यामुळे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून पुर्नवापर होवून नये म्हणून तत्काळ विक्रेता यांच्या समोरच हा साठा नष्ट करण्यात आला आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमावली अंतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेशजी नार्वेकर, सह आयुक्त ( नाशिक विभाग ) म.ना.चौधरी, जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे व अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ.साळुंके व श.म.पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अशी माहिती जळगाव जिल्हयाचे सहायक आयुक्त ( अन्न ) सं.कृ.कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Previous Post

राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न : मंत्री दादा भुसेंची माहिती !

Next Post

वाल्मिक कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर येणार टाच ?

Next Post
वाल्मिक कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर येणार टाच ?

वाल्मिक कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर येणार टाच ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ± झोनमध्ये समाविष्ट!
जळगाव

जळगाव जिल्हा औद्योगिक सवलतीच्या डी ± झोनमध्ये समाविष्ट!

May 28, 2025
धानोरा गावाजवळ ट्रॅक्टर पटली : चालक जागीच ठार !
क्राईम

धानोरा गावाजवळ ट्रॅक्टर पटली : चालक जागीच ठार !

May 28, 2025
मोठी बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !
राजकारण

मोठी बातमी : सोन्याच्या किमतीत मोठी घसरण !

May 28, 2025
एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
एरंडोल

एरंडोल शहरात खळबळ : मारहाणीत जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

May 28, 2025
राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !
क्राईम

राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !

May 28, 2025
टोल नाक्यावर शाब्दिक वाद : हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण
क्राईम

टोल नाक्यावर शाब्दिक वाद : हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण

May 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group