जामनेर : प्रतिनिधी
लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थाने तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथील कुटुंबाची २ लाखात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतर ४ दिवसांनी मुलगी व तिच्या मावस बहीणींनी पळ काढला. फत्तेपूर पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
योगेश काकडे (चिंचोलीपिंप्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेने राजेश शिलवंत (विद्यानगर, ता. जि. बीड) या मध्यस्थाची ओळख करून दिली. ९ रोजी शीलवंत हे मुलगी व तिच्या कुटुंबियांसह चिंचोली पिंप्री येथे आले. मुलीचा सांभाळ मावशीने केल्याचे सांगून त्यांना २ लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार लग्न आटोपल्यानंतर २ लाख देण्यात आले. १४ रोजी योगेश, त्याची पत्नी, मावस बहिणी, मित्र व कुटुंबीय असे परभणीकडे निघाले. वाटेतच जिंतूर येथे नवरीने मावसबहिणींसह पलायन केले.