Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा : एलसीबीने केला उद्ध्वस्त
    क्राईम

    अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा : एलसीबीने केला उद्ध्वस्त

    editor deskBy editor deskJanuary 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी भरलेले व रिकामे अशा ९ गॅस सिलिंडरासह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, वाघळी येथे सर्रासपणे वाहनांमध्ये गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून ९ हजार रुपये किमतीचे सीलबंद स्थितीत असलेले घरगुती वापराचे तीन सिलिंडर, १२ हजार रुपये किमतीचे सहा रिकामे सिलिंडर व १० हजार रुपये किमतीचे गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशीन व इलेक्ट्रिक मोटार तसेच प्लॅस्टिकच्या नळ्या, रेग्युलेटर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे कीट असा एकूण ३१ हजारांचा ऐवज जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हवालदार सुधाकर अंभोरे, राहुल पाटील, चालक भरत पाटील, हवालदार प्रवीण सपकाळे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयित दीपक केवट (वाघळी) याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.