जळगाव : प्रतिनिधी
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दर्शन शिंपी (१९, रा. आशाबाबानगर) याच्यासह अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (१३ जानेवारी) पुष्पलता बेंडाळे चौकातील नशिराबाद रिक्षा थांब्याजवळ करण्यात आली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याने पतंग विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी करून कारवाई केली जात आहे. ही कारवाई टळावी म्हणून एकाने रस्त्यावर नायलॉन मांजा विक्री सुरू केली. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि साजीद मन्सुरी, पोउनि योगेश ढिकले, पोकॉ अनिल कांबळे, पराग दुसाने यांनी पुष्पलता बेंडाळे चौकातील पेट्रोलपंपामागे जाऊन दर्शन शिंपी याच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले