जळगाव : प्रतिनिधी
शहरातील सतगुरु नगरासी गेंदालाल मिल परिसरातून चोरट्याने दोन दुचाकी चोरुन नेल्या. ही घटना उघडकीस आलनंतर रविवारी एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि जगवानी नगरात शुभम सागर माने (वय २५) हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास (एमएच ०९, डीएल ३८९१) क्रमांकाच्या दुचाकीने सतगुरु नगरात आले होते. याठिकाणाहून त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. याप्रकरणी सागर माने याने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रेल्वे विभागात नोकरीस असलेले कल्पेश कुमार राजेंद्र सोनवणे (रा. निमखेडी रोड) हे दि. ११ जानेवारी रोजी (एमएच १९, डीएल ३८१५) क्रमांकाच्या दुचाकीने गेंदालाल मिल समोर आले होते. त्यांनी दुचाकी याठिकाणी लावलेली असतांना, त्यांची दुचाकी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली