जळगाव : प्रतिनिधी
गेल्या महिन्यात जळगावातून दुचाकी चोरून पसार असलेल्या विजय श्रीराम बारेला (वय २४, रा. धुरकूट, जि. खरगोन) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देविदास कॉलनीतील भिकन दामू बोरसे यांची दुचाकी दि. १० डिसेंबर रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याचा तपास करीत असताना ही दुचाकी विजय बारेला याने चोरी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी यांनी बारेला याला अटक केले. त्याने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली. अटक केलेल्या विजय बारेला याच्यावर या पूर्वी चोपडा शहर, अडावद, जळगाव तालुका, धरणगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचे १० गुन्हे दाखल आहेत.