बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी घेतले ताब्यात
६ जानेवारी २०२५: एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगावचे पोलिस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, जळगाव शहरातील सागर हॉटेल व लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवला जात आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस स्टेशनला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यानंतर, पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पोलिसांच्या एक पथकाची रचना केली आणि त्यात पोसई राहुल तायडे, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोहेकॉ २७४५ राजेंद्र कांडेकर, मपोहेका सुनंदा तेली, पोकों इम्रान बेग, पोकों तुषार गिरासे, पोकों राहुल घेटे आणि पोकॉ छगन तायडे यांच्यासह दोन पंच आणि एक डमी ग्राहक देखील पथकात सहभागी झाले. डमी ग्राहकाला सागर लॉजमध्ये पाठवण्यात आले.
डमी ग्राहकाने सागर लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवला जात असल्याची खात्री दिल्यानंतर पोलिसांनी १३:५० वाजता सागर हॉटेल व लॉजवर छापा टाकला. या छापामारीमध्ये पोलिसांनी ०६ महिलांना व १ ग्राहकास ताब्यात घेतले. याशिवाय, हॉटेल मॅनेजर कुनाल एकनाथ येरापले (वय-२५, रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यालाही ताब्यात घेतले.
हॉटेल मॅनेजरकडून प्रश्न विचारल्यानंतर त्याने उघडकीस आणले की, लॉजचे मालक सागर नारायण सोनवणे हे वेशा व्यवसायासाठी बाहेरून महिलांना बोलावून, सागर लॉजमध्ये वेशा व्यवसाय चालवत आहेत. मॅनेजरने याबाबत पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे पोलिसांनी मॅनेजरला अटक केली. लॉजचे मालक सागर सोनवणे मात्र छापामारीच्या वेळी पसार झाले आहेत.
पोलिसांनी कारवाई दरम्यान पीडित महिलांची वैद्यकिय तपासणी केली आणि त्यांना आशादिप वस्तीगृह जळगाव येथे दाखल केले. पोलिसांची ही कारवाई त्यांच्या अधिपत्याखाली व वरील नमुद पोलिस स्टाफसह करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि SDPO संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कारवाईत पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सपोनि माधुरी बोरसे करीत आहेत.