जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर येथील घरी पायी जात असलेले भरत जगन सोनवणे (रा. हरिविठ्ठलनगर) यांच्या कमरेत लाथा मारत गटारीमध्ये पाडून दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (११ जानेवारी) रात्री हरिविठ्ठलनगरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत सोनवणे हे शनिवारी रात्री पायी घरी जात असताना लाकडी वखारीजवळ मागून एक अनोळखी आला व त्याने कमरेत लाथ मारली. त्यामुळे सोनवणे हे गटारीत पडले. ते उठत असताना दोनजणांनी डोक्यात दगड मारून दुखापत केली. याप्रकरणी भरत सोनवणे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे