जळगाव : प्रतिनिधी
पत्नी बाहेरगावी व मुलगा बाहेर गेलेला असताना लीलाधर कौतिक पाटील (४६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (१२ जानेवारी) दुपारी कुसुंबा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळ अगोदर मुलगा मोबाईल घेण्यासाठी घरात आला असताना, त्याला बाहेर पाठवून पाटील यांनी गळफास घेतला. काही वेळाने मुलगा घरात गेल्यानंतर त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे लीलाधर पाटील यांच्या पत्नी बाहेर गावी गेलेल्या होत्या तर ११ वर्षीय मुलगा बाहेर खेळत होता. याप्रकरणी लीलाधर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.