धरणगाव : प्रतिनिधी
विवाह होण्यापूर्वीच आपल्या होणाऱ्या पत्नीशी ती अल्पवयीन असताना शारिरीक संबंध ठेवल्याने तसेच ती गर्भवती राहिल्याने युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीचे एका युवकासोबत लग्न जुळले होते; परंतु विवाह होण्याआधी युवकाने अल्पवयीन युवतीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ६४सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम-४, ८, १२ प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी किशोर रामलाल मालचे यास धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.