जळगाव : प्रतिनिधी
गिरणा नदीवरील बांभोरी जवळील पुलावरून एका युवकाने शुक्रवारी रात्री ७.३० वाजता उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी युवकाने गिरणा नदीच्या पुलावरून आत्महत्या केली. पुलावरून जात असलेल्या काही वाहनधारकांना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. तालुका पोलिसांनी संबंधित युवकाचा मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला.