प्रतिनिधी गौरव पाटील। तालुक्यातील साळवा येथील संविधान रक्षक दल चौकात भीम आर्मी या सामाजिक संघटनेत अनेक तरूणांनी प्रवेश केला आहे.
याप्रसंगी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम प्रधान, जिल्हा संघटक डॉलीभाऊ वानखेडे, जिल्हा सचिव राजू इंगळे यांच्या उपस्थितीत २४ फेब्रुवारी रोजी सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. राज्य सचिव मा.सुपडू भाऊ संदानशिव यांनी सूत्रसंचालन केले व महाराष्ट्र राज्य प्रमुख रामकांत तायडे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी “भीम आर्मी” जळगांव जिल्हा युनिट ची आजवरची वाटचाल आपल्या भाषणातून विशद केली.
तालुक्यातील साळवा येथे भीम आर्मी संविधान रक्षा दलाच्या वतीने बुध्द विहार येथे बुध्दांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. व गावातील भारतीय संविधान चौकाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे राज्य प्रमुख रमाकांत तायडे, राज्य सचिव सुपडू संदानशिव, जिल्हाध्यक्ष श्रीकांत वानखेडे, उपाध्यक्ष विक्रम प्रधान, जिल्हा संघटक डॉलीभाऊ वानखेडे, जिल्हा सचिव राजू इंगळे, मंगल गायकवाड, डॉ.योगेश भालेराव, अजय अहिरे, निखिल पवार, परेश अहिरे, सचिन अहिरे, जयेश अहिरे, गौतम देवरे, शंतनु ररकर, वैभव सपकाळे, मयुर सोनवणे, आदित्य पवार, निखिल पवार,
धरणगाव तालुक्यातील कार्यकारिणी जाहीर
तालुका अध्यक्ष:- प्रशांत शिंदे/रोटवद. २) तालुका उपाध्यक्ष:- जयेश अहिरे/साळवा. ३) प्रचार-प्रसिद्ध प्रमुख:- देवेंद्र शिंदे/रोटवद. ४) तालुका उपाध्यक्ष२:- शेखर साळुंके/गंगापूरी., ५) सचिव:- गोरख थोरात/साळवा., ६) मुख्य संघटक:- अजय सोनवणे/बांभोरी. ७)संघटक:- परेश अहिरे/साळवा. ८)मुख्य सचिव:- प्रविन शिंदे/भोणे.


