जळगाव : प्रतिनिधी
शिवाजीनगर भागातील एका सॉ मिल मालकाकडून ७७ हजार रुपये किमतीचा प्लायवूडच्या माल घेतला. मात्र, पैसे घ्यायला गेले असता पैसे द्यायला नकार देत, ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश पुरुषोत्तम पटेल (वय ३८) यांची शिवाजीनगर भागात सॉ मिल आहे. नोव्हेंबर महिन्यात रावेर तालुक्यातील विवरे येथील आसिफ भाई (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी ७७ हजार रुपये किमतीचा प्लायवूडचा माल घेतला. तसेच हा माल घेतल्यानंतर तत्काळ झालेली रक्कम दिली जाणार असल्याचे सांगितले.
तेव्हा ही रक्कम देण्यात आली नाही. त्यानंतर अनेक दिवस संबंधिताकडे सॉ मिल मालकाने पाठपुरावा केल्यानंतरही ही रक्कम न मिळाल्याने, गुरुवारी सॉ मिल मालकाच्या फिर्यादीवरून आसिफ याच्यावर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.