नागपूर : वृत्तसंस्था
जगभरात सन २०१९ मध्ये कोरोना आजाराचा हाहाकार सुरु झाला होता तर आता पुन्हा एकदा नव्या विषाणूमुळे चीनमध्ये पुन्हा हाहाकार सुरु झाला असून राज्यात देखील आता चिकनगुनियाने हातपाय पसरले आहे. राज्यात रुग्ण संख्या वाढली आहे. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. ऐन थंडीत नागरिकांच्या हातपायांना ठणक लागली आहे. राज्यातील अनेक शहरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढले आहे. मुंबईसह अनेक शहरात या रोगाने डोके वर काढले आहे. तर नागपूर येथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे.
थंडीचा कडाका पु्न्हा वाढला आहे. तर मुंबई सारख्या शहरातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. पालिका क्षेत्रात न्यूमोनिया, चिकनगुनिया आणि विषाणूजन्य आजारात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चिकनगुनियच्या रुग्ण संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्य आरोग्य खात्याने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक ५ हजार ७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे.यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या दरम्यान मुंबईत ७३५ रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर आणि पुण्यानंतर मुंबईत रुग्ण संख्या वाढलेली आहे.