जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर येथे गेल्या आठवड्यात दि. २८ रोजी किराणा व्यापाऱ्याची ९६ हजारांची रोकड लंपास झाल्याची घटना घडली होती. किराणा दुकानात काम करणाऱ्या युवकाने चोरीचा खोटा बनाव रचला आणि त्यात स्वतः अडकला आहे. कैलास शंकर सटाले (३५, मुंदखेडा, ता. जामनेर) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पहूर बस स्थानक परिसरातील जळगाव ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाच्या कडेला असलेल्या किराणा दुकानातील मालविक्रीची ९६ हजार रुपयांची रक्कम वर्धमान स्टील दुकान मालक उज्ज्वल सिसोदिया यांच्याकडे जमा करण्यासाठी जात असताना, दि. २८ रोजी संध्याकाळी अज्ञात चोरट्यांनी त्याच्या हाताला झटका मारून बॅगसह रक्कम लांबविल्याची फिर्याद पोलिसात दाखल होती.
याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच तपास पोलिस उपनिरीक्षक भारत दाते सागर गायकवाड करीत होते यादरम्यान पोलिस निरीक्षक सचिन सानप, गोपाळ गायकवाड, विनोव पाटील, ईश्वर पाटील, ज्ञानेश्वर ढाकरे राहुल पाटील, जिजाबराव कोकणे य पथकाने सीसीटीव्ही फुटेज जामनेर त पहूर रस्त्यावर तपासणी केली. मात्र दुचाकीवरून पळणारे चोरटे निष्पन्न झाले नाही. अखेर कैलासला बेड्य ठोकण्यात आल्या.