अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात झालेल्या वादातून पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली नाही, म्हणून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना ३ रोजी घडली आहे.याबाबत पीडित मुलीच्या आईने मारवड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, त्यानुसार ३ रोजी सकाळी ९ वाजता ही महिला गच्चीवर कपडे टाकायला गेली होती. तिची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी लहान भावाला झोक्यात झोपवून झोका देत होती. मुलीचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने महिला घरात आली असता भाऊसाहेब उर्फ प्रशांत अशोक बोरसे हा झोक्याजवळ उभा दिसून आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून गेला. मुलीने सांगितल्यानुसार या महिलेने जाब विचारला असता भाऊसाहेब याची आई उषाबाई बोरसे हिने काहीही ऐकून न घेता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मागील तक्रार मागे न घेतल्यास आपण असेच करत राहू, अशी धमकी महिलेला दिली. याबाबत महिलेने ४ रोजी मारवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोउनि राहुल बोरकर हे करीत आहेत