भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील टेमी व्हिला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेल्या धनादेशचा गैरवापार करून सुमार २५ लाख ५ हजार ६०० रूपयांची फसणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी २ जानेवारीला सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील टेमी व्हिला येथे अदिल रूसी कविना (वय ५७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. तर व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यांच्या ओळखीचे कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी (रा. विठ्ठल मंदिरवार्ड, भुसावळ) यांना विश्वासाने त्यांनी दोन धानदेश दिले होते. या दोघांनी २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर दरम्यान या काळात संगनमत करून १ लाख १५ हजार आणि २३ लाख ९० हजार ६०० रूपयांचे वेगवेगळे धनादेश परस्पर खात्यात वर्ग करून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर आदिल कविना यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार २ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.