जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून नजीक असलेल्या ममुराबाद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाची प्रकृती अस्वस्थ असल्याने सचिन अशोक सावळे (वय ३४) या तरुणावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव एकच आक्रोश केला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मत्यची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथे सचिन सावळे हा तरुण वास्तव्यास होता. सलूनचे दुकान चालवून तो कुटुंबियांना हातभार लावित होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास सचिनने काहीतरी विषारी औषध प्राशन केले. कुटूंबियांनी सचिनला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास सचिनची प्राणज्योत मालवली.