जळगाव : प्रतिनिधी
मिळकतीमधील हक्क डावलण्यासाठी खोटे कागदपत्रं व बनावट मृत्युपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी वकिलांसह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्यायालयाचे आदेशाने दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विश्रामनगर येथील श्रद्धा योगेश देसाई यांच्या सासऱ्यांच्या नावाने बनावट मृत्युपत्र तयार करून मिळकतीमधील हक्क डावलण्यासाठी उषा देसाई, दीपक देसाई, राजेश देसाई, स्वाती देशमुख, आनंदराज पाटील, रमेश पवार, अशोक पवार, अॅड. कालिंदी चौधरी यांनी न्यायालयात हजर केले होते. दरम्यान, हे मृत्युपत्र बनावट असून, न्यायालयाची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब श्रद्धा देसाई यांनी न्यायालयात वकिलामार्फत मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशाने शहर पोलिसांत बनावट मृत्युपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे