मेष : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. जवळच्या नातेवाईकाचे सहकार्यही लाभेल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यातही तुमची महत्त्वाची भूमिका असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी राहील.
वृषभ : महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्यास चांगले यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश लाभेल. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी वेळ अनुकूल नाही. व्यवसायिक जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी मशिन, कर्मचारी इत्यादींबाबत समस्या उद्भवू शकतात.
मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील. एकमेकांशी समन्वय साधून कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल.
कर्क : आर्थिक प्रश्नावर घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. दैनंदिन ताणतणावापासून मुक्तता अनुभवाला. कलात्मक क्षेत्रात रुची वाढेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक आहे.
सिंह : आज सकारात्मक लोकांसोबतची चर्चा तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. तरुणाई आपले ध्येयप्रती समर्पित राहतील. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. व्यवसायात अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
कन्या : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. कोणतेही अडकलेले पेमेंट देखील सहज मिळू शकते. सामाजिक कार्यातील सहभागाने मानसिक शांती लाभेल. मुलांना जास्त मोकळीक दिल्याने त्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. व्यवसायातील सर्व कामे व्यवस्थित सुरु राहतील.
तूळ : आज कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर घेवू नका. तुम्ही मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी योग्य वेळ आहे. कोणतेही काम संयमाने आणि विवेकाने करा. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक : अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करेल. कोणताही निर्णय ताबडतोब घेण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.
धनु : घर बदलण्याची योजना असेल तर ती अंमलात आणण्यासाठी आजच योग्य वेळ आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. महिलांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
मकर : जवळच्या नातेवाईकांचे घरी आगमन होईल. कोणत्याही समस्येवर चर्चेतून मार्ग सापडेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हाल. किरकोळ गैरसमजांमुळे मित्र किंवा भावंडांशी संबंध खराब होऊ शकतात. इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. व्यवसायात अत्यंत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.
कुंभ : अनुकूल ग्रहमानात आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्या. विशेषतः महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. शेजाऱ्यांशी संबंध खराब करू नका. कोणत्याही चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
मीन : आजचा दिवस एक सुखद अनुभव असेल. महत्त्वाचे प्रश्नावर तोडगा निघाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल. कोणत्याही मुलाखतीत यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. वास्तावचा विचार करुन नियोजन करा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे कठीण काळात पूर्ण सहकार्य मिळेल.