जळगाव प्रतिनिधी । सावखेडा शिवार कोल्हे हिल्स परिसर, वाघनगरातील स्थानिक रहिवाशी यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार कोल्हे हिल्स परिसर, वाघनगर या भागात वस्त्या वाढल्या आहेत. मात्र आठ दहा वर्ष उलटूनही या ठिकाणच्या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेला नाहीये. निवडणुका होतात आश्वासनच आश्वासनांचा पाऊस पडतो मात्र पाण्याची समस्या काही दूर झालेले नाही. पाणीपुरवठा योजना नाही, नागरिकांना नळकनेक्शन मिळालेलं नाही. पाणीटंचाईमुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असून पाणीटंचाई दूर करावी तसेच पाण्याची पर्यायी योजना उपलब्ध करावी या मागणीसाठी नागरिकांसह महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला व प्रशासनाला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, शहरउपाध्यक्ष आशिष सपकाळे, मुकुंदा रोटे, राजेंद्र निकम, कुणाल पवार, विनोद शिंदे, जमील देशपांडे – जील्हाध्यक्ष विनोद शींदे, संदीप महाले, योगेश पाटील, पंकज चौधरी, कुणाल पाटील, महेश माळी, जयंवत राजपूत यांच्यासह सावखेडा शिवार कोल्हे हिल्स परिसर, वाघनगरातील रहिवाशी महिला यांची उपस्थिती होती.