मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व नेते छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर आले असतांना महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाचे दिग्गज नेते व माजी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा राज्यभर असतांना यावेळी महादेव जानकर यांनी छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे.
यावेळी महादेव जानकर यांनी नेते छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे. महादेव जानकर म्हणाले कि, “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांना छगन भुजबळांवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळांना एक मोलाचा सल्लाही दिला.
“ओबीसींची अशीच अवस्था होणार आहे. ज्या समाजाचे दल आहे, त्या समाजाचे बळ आहे. अन्याय झाला म्हणून मी आता बोलू शकणार नाही. कारण आपला पक्ष नाही. आपण याचिकाकर्ते आहोत. देणारे बनणारे असाल, तर आम्ही आमचं दल केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा, आम्ही तुमच्याबरोबर युती करु. त्यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगलं होईल. आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल”, असे महादेव जानकर म्हणाले.
“मागितल्याने भीक मिळते, हक्क मिळत नाही त्यामुळे मागण्यापेक्षा देणार झालं पाहिजे ओबीसीबाबत भाजप आणि काँग्रेसची पण नियत चांगली नाही. राज्यात एव्हीएम सेट करण्यात आला म्हणून यांची थंपिंग मेजोरिटी आली. आमची मतही भाजपला वळवण्यात आली आहेत. बलेट पेपरवर निवडणूक घ्या, आमच जे होईल ते होईल. ईव्हीएम लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत”, असेही महादेव जानकरांनी म्हटले.