अमळनेर : प्रतिनिधी
पोलिसांना माहिती देतो या संशयावरून दादू धोबी उर्फ राजेश एकनाथ निकुंभ याने एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ३१ रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सुभाष चौकात घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवशक्ती चौकातील राहुल रमेश भोई (वय २९) हा त्याच्या मित्रांसोबत ३१ रोजी सुभाष चौकात उभा होता. याप्रसंगी दादू उर्फ राजेश रकनाथ निकुंभ याने राहुलला हटकत, तू पोलिसांना माहिती देतो. त्यावरून दादू धोबी याने चाकूने राहुलच्या मानेवर वार केला. परंतु, खांद्यावर तो वार झेलल्याने राहूल जखमी झाला. तर त्याच्या मित्रांनी भांडण सोडवल्यानंतर दादूने ‘आज तो बच गया, अगली बार छोडूंगा नही’ अशी धमकी देत तो निघून गेला. मित्रांनी राहुलला रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर अमळनेर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.