रावेर : प्रतिनिधी
शहरातून मोताळा येथे विक्रीसाठी विना परवाना मालवाहू वाहनातून प्रत्येकी दोन बैल व एक गोन्ह्याची वाहतूक करताना ही दोन्ही वाहने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी पहाटे साडेचारवाजेच्या सुमारास जप्त करण्यात आले. याबाबत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शेख करीम शेख शफीउद्दीन (वय ३२, प्रशिक नगर, उटखेडा रोड, रावेर) व सैय्यद खलील सैय्यद मंगलू (वय ३३, मोमिनवाडा, रावेर) हे दोन्ही त्यांच्या छोट्या दोन लाख रुपये किमतीच्या मालवाहू वाहनामधून प्रत्येकी २० हजार किमतीचे दोन बैल व १० हजार किमतीच्या एका गोन्ह्याची तर दुसऱ्या दोन लाख रुपये किमतीच्या छोट्या मालवाहू वाहनातून प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे दोन बैल व १० हजार किमतीचा एक गोन्हा असे एक लाखाचे गोवंश बेकायदेशीररित्या वाहतूक करताना आढळले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे