• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नवीन वर्षाची पहाट ठरली घातक : तरुणाचा अंकलेश्वर येथे अपघाती मृत्यू

editor desk by editor desk
January 3, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
नवीन वर्षाची पहाट ठरली घातक : तरुणाचा अंकलेश्वर येथे अपघाती मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील वरणगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज नगर मधील रहिवासी व आई वडिलांचा एकुलता मुलगा हितेंद्र प्रकाश सोनार (३२) हा तरुण गुजरातमधील अंकलेश्वर येथे कंपनीमध्ये नोकरीस होता. कामावर जाताना १ जानेवारी रोजी त्याचा अपघातात मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीस असलेल्या या युवकाचे एमएससी पर्यंत शिक्षण झाले होते पाच-सहा वर्षांपासून तो अंकलेश्वर येथील कंपनीमध्ये नोकरीला होता. वरणगाव येथे वृद्ध आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करीत असताना तो त्यांना अंकलेश्वर गुजरात येथे घेऊन गेला होता. तेथेच नोकरी करुन त्या व्यतिरिक्त फावल्या वेळेत तो फर्निचरची कामे करीत होता. अशाप्रकारे रात्रंदिवस मेहनत करून त्याने तेथे घरसुद्धा घेतले होते.

अडीच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. त्याला दीड वर्षाची मुलगी आहे. १ जानेवारी रोजी घरातून सहा वाजता नोकरीच्या ठिकाणी दुचाकीने जात असताना घरापासून काही अंतरावर मुख्य महामार्गावर त्याच्या दुचाकीला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. परंतु रस्त्यावरील कोणीही त्याला मदत न केल्यामुळे तो त्याच ठिकाणी दीड तासांपर्यंत पडून राहिल्यामुळे त्याच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊन तो जागीच गतप्राण झाला. त्याच्या आई- वडिलांना ही वार्ता तब्बल दीड तासांनी कळाल्यावर ते अपघातस्थळी दाखल झाले. त्याचा मृतदेह पडलेला पाहून त्यांनी हंबरडा फोडला, याचवेळी वरणगाव मूळ राहणारे महेंद्रसिंग राऊळ व त्यांचा मुलगा अमर राऊळ यांना घटना कळाल्याबरोबर ते अपघातस्थळी मदतीला धावून गेले. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचा मृतदेह वरणगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत आणण्यात आला.

Previous Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : दोघे मावसभाऊ गंभीर

Next Post

चार बैल व दोन गोह्याची वाहतूक; दोन वाहने जप्त

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चार बैल व दोन गोह्याची वाहतूक; दोन वाहने जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group