भुसावळ : प्रतिनिधी
मंगळवारी (दि.३१) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे मावसभाऊ गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला.
सविस्तर वृत्त असे कि, सर्फराज युनूस पिंजारी (वय २७, रा. किनगाव खुर्द, ता. यावल) आणि त्याचा मावसभाऊ अनिस शकील पिंजारी (रा. खिरोदा, ता.रावेर) हे मंगळवारी रात्री ११.३० वाजता दुचाकीने वरणगावकडून भुसावळकडे येत होते. निंभोरे शिवारात समोरून वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सर्फराज पिंजारी व मावसभाऊ अनिस पिंजारी हे दोघे जखमी झाले. दोघांना वरणगाव येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार योगेश पालवे करत आहे.