• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ : मंत्री तटकरे यांची माहिती !

editor desk by editor desk
January 2, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ : मंत्री तटकरे यांची माहिती !

मुंबई  : वृत्तसंस्था

राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, असे आदिती तटकरे म्हणाल्या.

आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांनाच या योजनोचा लाभ घेता येणार आहे. सध्या सरसकट छाननी होणार नाही. केवळ स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या अर्जाबाबत तक्रार दिली केवळ त्या अर्जांची पडताळणी करणार असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.

आपण कुठेही विनातक्रार लाभार्थ्यांची पडताळणी करणार नाहीत. मात्र, उत्पन्नात वाढ झाली असेल, अडीच लाखांच्या पुढे लाभार्थ्याचे उत्पन्न गेले असेल, तर ती महिला योजनेसाठी पात्र राहणार नाही. काही महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन अर्ज केले होते. काही महिलांचे लग्नानंतर राज्याबाहेर स्थलांतर झाले आहे. चारचाकी वाहने ज्यांच्या नावावर असतील आणि तरी देखील ज्यांनी अर्ज केला असेल, त्यांच्या नावांचा शोध घेण्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाईल. तसेच आधार कार्ड आणि बँकेतील नावात तफावत असल्यास ते अर्जदार योजनेसाठी पात्र असणार नाहीत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

मोठी बातमी : मनू भाकर, डी.गुकेशसह ४ खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर

Next Post

विद्यार्थी आणि तरुणांच्‍या प्रतिभेला चालना मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

विद्यार्थी आणि तरुणांच्‍या प्रतिभेला चालना मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group