पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील वाघरे येथील ५२ वर्षीय प्रौढाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ डिसेंबरला घडली. ३१ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वाघरे येथील विजय गुलाबराव पाटील (वय ५२) यांनी आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुती दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना समजताच नागरिक व इतरांनी त्यांना खाली उतरवले व कुटीर रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. याबाबत संदीप पाटील यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.