नवी दिल्ली वृत्तसंस्था ;- कोरोना काळात (देशभरात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये प्रवासी गाड्या बंद होत्या. दरम्यान या काळात मध्ये रेल्वेने रेल्वे परिसरातील भंगार साहित्यातून कोट्यवधींची कमाई केली आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये मध्य रेल्वेने वेगवेगळ्या परिसरातील भंगार साहित्य विकून 391 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.
मध्य रेल्वेने केली मोठी कमाई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान विविध रेल्वे परिसरातील स्क्रॅप विकून मध्य रेल्वेने केवळ 391 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे असं नाही तर यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यात खूप मदत झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अनेक विभागांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.