जळगाव : प्रतिनिधी
रस्ता ओलांडत असतान भरधाव बसने धडक दिल्यामुळे मयाराम फुलसिंग बारेला (वय २५, रा सुनसगाव, ता. जामनेर) हा तरुण ठार झाला. हा अपघात ३१ डिसेंबर रोज दुपारी उमाळा गावाजवळ झाला एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयाराम बारेला हे उमाळा येथे रस्ता ओलांडत असताना दुभाजकावरून्न खाली उतरले व त्याच वेळ जळगावकडे येणाऱ्या बसने त्यांन धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय बडगुजर करीत आहेत