मुंबई : वृत्तसंस्था
जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत होत आहे तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याची चमक वाढली आहे. आज बुधवारी (दि. १ जानेवारी २०२५) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेटच्या दरात ३७२ रुपयांची वाढ होऊन ते प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपयांवर पोहोचले आहे. मंगळवारी (३१ डिसेंबर २०२४) शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१६२ रुपये होता. त्यात आज वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात ११७ रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,५३४ रुपये, २२ कॅरेट ७०,१०५ रुपये, १८ कॅरेट ५७,४०१ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ४४,७७२ रुपयांवर खुला झाला. तर चांदीचा दर प्रति किलो ८५,९०० रुपयांवर खुला झाला आहे.
याआधी ३० ऑक्टोबर रोजी सोने दराने प्रति १० ग्रॅम ७९,६८१ रुपयांचा उच्चांक गाठला होता. तर चांदीचा दर २३ ऑक्टोबर रोजी प्रति किलो ९९,१५१ रुपयांवर गेला होता.