• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बिलवाडी येथील विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 21, 2022
in क्राईम, जळगाव
0
बिलवाडी येथील विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । माहेरून प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून तालुक्यातील बिलवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाड येथील कविता ऊर्फ भैरवी यांचा काही वर्षापुर्वी शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील लहु देवीदास बागुल यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासू जेठ नणंद यांनी कविता हिस प्लॉट घेण्यासाठी तिच्या माहेरून दीड लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. यासह कविताला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. एके दिवशी कविताला तिच्या पतीने मारहाण करून घराच्या बाहेर काढून दिले पैसे आणल्याशिवाय परत येऊ नको असा दम दिला. अशा आशयाच्या कविता ऊर्फ भैरवी बागूल या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पती लहू बागूल, सासू नादरबाई देविदास बागुल, जेठ कुश देविदास बागुल, नणंद प्रतिभा चंद्रकांत सोनवणे सर्व रा. कळमसरे ता. शिरपुर जिल्हा धुळे यांच्याविरोधात रविवार २० फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Previous Post

आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; रामानंदनगर पोलीसांची कारवाई

Next Post

किनगाव येथे पाच हजाराची लाच स्विकारणाऱ्या मालोदच्या कोतवालासह एका पंटरला रंगेहात पकडले

Next Post
किनगाव येथे पाच हजाराची लाच स्विकारणाऱ्या मालोदच्या कोतवालासह एका पंटरला रंगेहात पकडले

किनगाव येथे पाच हजाराची लाच स्विकारणाऱ्या मालोदच्या कोतवालासह एका पंटरला रंगेहात पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group