जळगाव : प्रातिनिधी
विषारी पदार्थ सेवन केलेल्या तरुणावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना या तरुणाची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील परवेश जब्बार खाटीक (वय २६, रा. म्हसावद, ता. जळगाव) या तरुणाने विषारी पदार्थ सेवन केले होते. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातदाखल केले होते. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.