जळगाव : प्रतिनिधी
आठवडे बाजारामध्ये आलेल्या ज्योती भानुदास कापुरे (४९, रा. कोठारी नगर) यांची २४ हजार रुपये किमतीची सोनपोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २४ डिसेंबर हरिविठ्ठलनगरमध्ये घडली.
याप्रकरणी ३० डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों सुशील चौधरी करीत आहेत. ज्योती कापुरे या हरिविठ्ठलनगर येथे आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.