Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; रामानंदनगर पोलीसांची कारवाई
    क्राईम

    आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; रामानंदनगर पोलीसांची कारवाई

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगर परिसरातून (एम.एच.१९ सी. यु. १७५३) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यास त्यानुसार रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पोलिस नाईक जितेंद्र तायडे यांच्यासह कर्मचार्‍यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी आशाबाबा नगर येथे वाळुची वाहतूक करणार्या संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई केली. एक ब्रास वाळूने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर असा दोन लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अनिल वना पाटील रा. वैजनाथ ता. एरंडोल व ट्रॅक्टरमालक या दोन जणांविरूध्द रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तायडे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.