धरणगाव प्रतिनिधी । आतापर्यंत आपण पतीपासून होणाऱ्या छळ बाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील. परंतू कायद्याने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर अधिक प्रमाणावर होत असल्याचेही अनेक किस्से समोर आले आहे. परंतू एखाद्या पत्नीच्या माहेरच्या मंडळीपासून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या तरूणाने काय मार्ग घ्यावा आता हे तुम्हीच वाचा.
धरणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात अश्याच एका तरूणाने बेमुदत उपोषण सुरू करून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. धरणगाव तालुक्यातील हा तरूण असून पत्नीच्या म्हणजेच सासरच्या लोकांकडून होणारा त्रास कमी होवून न्याय मिळावा, कलम ४९८ चा गैरवापर कमी होण्यासाठी त्यात सरकारने दुरूस्ती करावी व पुरूषांच्या बाजूने कायद्याचे शसक्तीकरण व्हावे. महिलांप्रमाणेच पुरूषांसाठी देखील त्यांच्या होणारा अन्याय दुर करण्यासाठी सरकारने पुरूष दक्षता समिती स्थापन करावी अश्या मागण्या केल्या आहे. या तरूणाने ९ फेब्रुवारीपासून साखळी उपोषण सुरू केले होते. १६ फेब्रुवारीपर्यंत साखळी उपोषणाची दखल न घेतल्यान तरूणाने आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. दरम्यान धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तरूणाची समजूत घालून ऊसाचा रस देवून उपोषण सोडविले. व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे अश्वासन दिले.