Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शरद पवार गटाचे आमदार, खासदार अस्वस्थ : सत्तेसोबत जाण्याचा घेवू शकतात निर्णय !
    राजकारण

    शरद पवार गटाचे आमदार, खासदार अस्वस्थ : सत्तेसोबत जाण्याचा घेवू शकतात निर्णय !

    editor deskBy editor deskDecember 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात गेल्या काही वर्षापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी मोठे बंड करून महायुतीसोबत आले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला प्रंचड बहुमत मिळाल्यानंतर आता शरद पवार गटाचे काही आमदार अजित पवार यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रही दिसत असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.

    विधानसभेला पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार, खासदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. ८, ९ जानेवारीला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशीही त्यांची भूमिका आहे. त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात, यावर पुढील घडामोडी ठरणार आहेत.

    सत्ता नसल्याने पुढील ५ वर्षे मतदारसंघातील विकासकामे होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे, हा प्रश्न या नेत्यांना सतावतो आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करावे आणि संघटन अधिक मजबूत करून पुढची वाटचाल करावी, असे बहुतेकांचे मत आहे. जितेंद्र आव्हाड, राेहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र या प्रस्तावाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवावे आणि विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे त्यांना वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.