• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जि.प.लेखाधिकाऱ्याचा अपघात उपचारादरम्यान मृत्यू

editor desk by editor desk
December 31, 2024
in क्राईम, जळगाव
0
जि.प.लेखाधिकाऱ्याचा अपघात उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव : प्रतिनिधी

रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (५४, रा. खोटेनगर) यांचा उपचार सुरू असताना सोमवारी (३० डिसेंबर) दुपारी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप वानखेडे हे गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात कॅफोसह गेले होते. जेवणाचा डबा नसल्याने महाराष्ट्र बँकेलगत ते पराठे घेण्यासाठी आले. पोलिस निवासस्थानाजवळ वाहन लावून ते पायी रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली होती. यात ते हवेत फेकले जाऊन खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. इतर सहकाऱ्यांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना सोमवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त

Next Post

जळगावात तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगावात तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group