Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त
    क्राईम

    गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणारे मशीन जप्त

    editor deskBy editor deskDecember 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    अवैध वाळू चोरीविरुद्ध कारवाई सुरूच असून तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रात अवैधपणे वाळूचे उत्खनन करणारे मशीन महसूल पथकाने जप्त केले. ही कारवाई २८ डिसेंबर रोजी रात्री करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कालिंका माता चौकात झालेल्या अपघातानंतर वाळूविरुद्ध कारवाई सुरू आहे. त्यात तालुक्यातील धानोरा गावाजवळील गिरणा नदीपात्रात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू असताना महसूल पथकाने रात्री कारवाई केली. यावेळी नदीपात्रात लोखंडी वायर रोपफावडा मशीन आणि उपसा केलेली पाच ब्रास वाळू आढळून आली. पथकाने हे सर्व साहित्य जप्त केले. याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मयूर महाले यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.