Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मैदानावर क्रिकेट खेळताना खेळाडूचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    मैदानावर क्रिकेट खेळताना खेळाडूचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जालना : वृत्तसंस्था

    राज्यातील जालना शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्रिकेट खेळताना एका 32 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला आहे. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याला प्राण गमवावे लागले असल्याचे समजते. आपल्या सहकारी फलंदाजाशी बोलून थोडे पुढे गेल्यावर तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि थेट जमिनीवर कोसळला. यावेळी मदतीसाठी इतर खेळाडू धावले, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तरुणाचा मृत्यू झाला.

    जालना येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धा सुरू असताना विजय पटेल हा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सामान्यादरम्यान त्याने आपल्या सहकारी फलंदाजाशी संवाद साधला त्यानंतर विजय पटेल फलंदाजी करण्यासाठी परतत असतानाच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ग्राउंडवर कोसळला. यानंतर तातडीने इतर खेळाडू त्याच्या मदतीसाठी धावले व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला.
    या घटनेविषयी बोलताना विजय पटेल याच्या सहकारी मित्राने सांगितले की, अचानक खेळता खेळता विजय खाली पडल्याचे आम्हाला दिसले. त्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो, पण हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात सांगण्यात आले, अशी माहिती सहकारी मित्राने दिली आहे.

    जालना येथील फ्रेजर बॉइज मैदानावर ख्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरू होते. या स्पर्धेतील एका सामन्यात हा प्रकार घडला आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सध्याच्या जीवनशैलीत तरुणांना विशेषतः वयाच्या 30-32 या वयात हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जीवनशैली चांगली ठेवण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.