मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांंच्यावर टीका करताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी अश्लिल आणि निंदनिय विधान केले.
या प्रकरणी प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाकडून या तक्राराची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाच्या चाैकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी चाकणकर म्हणाल्या की, “तक्रार अर्जाची प्रत बीड पोलीस अधिक्षक, मुंबई पोलीस अधिक्षक तसेच सायबर क्राईम यांना पाठवण्यात आली आहे. बीड सायबरकडून प्राजक्ता यांच्यावर करण्यात आलेल्या अश्लील आणि अशलाक्य विधानाची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशी कार्यवाही करावी. कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य आयोगाला सादर करावा, असे पत्र देण्यात आल्याचे चाकणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.