धरणगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्वपक्षीय शिवजयंती मोठ्या उत्साहाने व नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करण्यात आली.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले.
मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार सर्व जातीधर्माचे मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राजा होणे कोणीच शक्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ती तरुणांनी आचरणात आणावे.ते कधीही जातीपातीचे राजकारण करत नव्हते.
देसले साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज जुने इतिहासकरांनी त्यांचा जो इतिहास समाजापुढे मांडला समाजापुढे तो इतिहास तसा नव्हता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत नवीन इतिहास लिहिला गेला पाहिजे. तरुणांनी व्यसनाकडे न जाता समाजासाठी काहीतरी करण्याचा उद्दिष्ट ठेवावा.
या प्रसंगी पालकमंत्री मा.ना गुलाबरावजी पाटील, शिवव्याख्याते प्रदीप देसले सर, काँग्रेसचे नेते डी.जी.पाटील सो,शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,प्रा.डी. आर.पाटील,उद्योगपती सुरेश नाना चौधरी,जीवन आप्पा बयस,चर्मकार समाजाचे नेते भानुदास आप्पा विसावे,सकल मराठा समाजाचे जिल्हा अध्यक्ष पी एम पाटील सर,जिल्हा अध्यक्ष संजय महाजन,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी,युवा अध्यक्ष चंदन पाटील,नगराध्यक्ष निलेश चौधरी,उपनगराध्यक्ष विलास महाजन, न.पा.चे सर्व सहकार्य नगरसेवक,अँड.वसंतराव भोलाणे,भा.ज.पा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील,नगराध्यक्षा सौ उषाताई वाघ,नगरसेविका कीर्ती मराठे,अंजली वीसावे,युती सेना तालुका अध्यक्ष नेहा पाटील,सौ भारती चौधरी,सकल मराठा समाजाचे नेते गुलाब मराठे,गोपाल पाटील,धरणगावातील सर्व पत्रकार,सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी प्रा बी एन चौधरी यांची साहित्य संमेलन जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
द क्लियर न्यूज पुरवणीचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.
प्रास्ताविक मा.नगराध्यक्ष पी.एम.पाटील सर यांनी केले सूत्रसंचालक प्रा किरण पाटील यांनी केले आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोपाल पाटील, गुलाब मराठे,संदीप पाटील, वाल्मिक पाटील,योगेश पी पाटील,राहुल मराठे,भागवत मराठे,निलेश महाजन, किशोर पहेलवान,योगेश महाजन, धनंजय कापडणे,ललित मराठे, कांतीलाल माळी,सुधर्मा पाटील , रेवानंद पाटील,गौरव चव्हाण,समाधान पाटील,यांनी परिश्रम घेतले.