• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; साहित्यांसह तयार माल खाक

editor desk by editor desk
December 30, 2024
in क्राईम, जळगाव, राज्य
0
जळगाव एमआयडीसीत चटई कंपनीला भीषण आग; साहित्यांसह तयार माल खाक

जळगाव : प्रतिनिधी

औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कंपनीला आग लागून कंपनीतील तयार मालासह साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणालाही काही दुखापत झाली नाही. मात्र आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ व धूर उंच आकाशात जात होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना रविवारी (२९ डिसेंबर) रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील डी-८१ सेक्टरमध्ये उन्मेष चौधरी यांची सिद्धिविनायक नावाने चटई कंपनी आहे. रविवारी रात्री नियमितपणे शिफ्ट सुरू असताना सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कंपनीमध्ये अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच कंपनीतील सर्व कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले व आग वाढत जाऊन संपूर्ण कंपनीला तिने कवेत घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब व खासगी कंपनीचे फोमचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

याद्वारे रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलिस ताफा पोहोचला व त्यांनी आवश्यक उपाययोजना करीत जमावाला दूर राहण्यास सांगितले.

कंपनीला आग लागताच सर्वजण बाहेर निघाले तसेच घटनेची माहिती मिळतात आजूबाजूच्या नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग एवढी भीषण होती की सुरुवातीला जवळ जाण्याची कोणीही हिंमत करत नव्हते. आग लागताच सर्व कामगार बाहेर पडल्याने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती कंपनीचे मालक उन्मेष चौधरी यांनी दिली.

Previous Post

या राशीतील लोकांना व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता !

Next Post

डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात

Next Post
डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात

डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group