धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी तुषार पाटील हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी युजीसीमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले.
त्यांनी जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयात पदवीचे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे तसेच पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.