• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : स्कूल बसखाली ५५ वर्षीय इसम जागीच ठार

editor desk by editor desk
December 28, 2024
in क्राईम, जळगाव, यावल, राज्य
0
धक्कादायक : स्कूल बसखाली ५५ वर्षीय इसम जागीच ठार

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात पहेलवान ढब्याजवळ चालक बस मागे घेत असताना घडला. घटनेनंतर बस चालक तेथून पसार झाला. या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल्यावर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील  अकलूद या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (एमएच २१/ बीएच ०६१३) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान यांच्या ढाब्यासमोर होता. बस मागे घेत असताना या बसची धडक लागल्याने पंडित मोहन बादशाह (५५, रा. कासवे) हे जागीच ठार झाले. ते दाढी कटींग करायला आले होते. या अपघातानंतर चालक घाबरून बस सोडून तेथून फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली व तातडीने फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली.

फैजपूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार प्रभाकर चौधरी, हवलदार विकास सोनवणे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणला. पंचनामा करून बसदेखील ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पाडळसा पोलिस पाटील सुरेश खैरनार यांच्या खबरीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहेत.

Previous Post

मोलकरणीचा प्रताप : डॉक्टरांच्या घरात मारला लाखो रुपयांचा डल्ला !

Next Post

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group