Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोलकरणीचा प्रताप : डॉक्टरांच्या घरात मारला लाखो रुपयांचा डल्ला !
    क्राईम

    मोलकरणीचा प्रताप : डॉक्टरांच्या घरात मारला लाखो रुपयांचा डल्ला !

    editor deskBy editor deskDecember 28, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील विवेकानंद नगरात राहणारे डॉ. प्रकाश बुधा चित्ते यांच्या घरातून सोन्याची ४ लाखांची बिस्किटे व २० लाखांची रोकड, असा एकूण २४ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. हा ऐवज त्यांच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीनेच चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संशयित आरोपी छायाबाई संग्राम विसपुते (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी) या मोलकरणीवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादीनुसार, विवेकानंद नगरातील श्री संतुलन हॉस्पिटल येथे डॉ. प्रकाश बुधा चित्ते (वय ४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात मे २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत संशयित महिला छायाबाई संग्राम विसपुते हिने वेळोवेळी घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि ५२ ग्रॅम वजनाची सोन्याचे बिस्कीट असा एकूण २४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गुरुवारी डॉ प्रकाश चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. त्यानुसार, छायाबाई संग्राम विसपुते यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    डॉ. चित्ते यांच्याकडे छायाबाई विसपुते या गेल्या चार वर्षापासून कामाला आहेत.

    त्यामुळे त्या डॉक्टर दाम्पत्याच्या अत्यंत विश्वासू झाल्या होत्या. मात्र, मे ते डिसेंबर महिन्यापर्यंत २० लाखांची रोकड व ५४ ग्रॅमची सोन्याची बिस्किटे असा एकूण २४ लाखांचा ऐवज लंपास झाल्याचा प्रकार घडला. या दरम्यानच्या काळात छायाबाई यांनी फ्लॅट घेतला. हा फ्लॅट घेत- ल्यानंतर डॉक्टरांची शंका छायाबाई विसपुते यांच्यावर गेली. त्यानंतर, गुरुवारी त्यांनी जिल्हापेठ पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. दरम्यान, जिल्हापेठ पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.