• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव सायबर पोलिसांना यश : ६९ लाख रुपयांची रक्कम आणली परत !

editor desk by editor desk
December 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव : प्रतिनिधी

ऑनलाइन फसवणुकीतून दोन जणांनी गमावलेल्या १ कोटी २४ लाख रुपयांपैकी ६९ लाख रुपयांची – रक्कम परत आणण्यात जळगाव सायबर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते हे उपस्थित होते. या घटनांपैकी पहिल्या घटनेत जळगाव शहरातील संतकुमार उईके यांना १८ जुलै रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपवरुन एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दिले. त्यात टप्प्याटप्प्यात १ कोटी ६ लाख रुपये नेटबँकींगव्दारे उईके यांनी भरले. मात्र, त्याचा परतावा आला नव्हता. सायबर पोलिसांनी उईकेयांनी ज्या खात्यात रक्कम भरली होती त्याचा पत्ता लावत, १ कोटी ६ लाखांपैकी ५२ लाख ४७ हजार रुपयांची रक्कम परत मिळविली. ही रक्कम न्यायालयामार्फत उईके यांना परत देण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत जळगाव शहरातील रहिवाशी राजेंद्र गुलाबराव गरुड यांना १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान दोन जणांनी व्हॉटसअॅप वरुन मनी लॉड्रीगमध्ये त्यांचे सीम कार्ड व आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगत त्यांच्यावर मुंबई क्राईम ब्रांचमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे भासविले. त्यानंतर त्यांना मोबाईलवरुनच ‘डीजिटल अरेस्ट’ करुन त्यांच्याकडून १८ लाख रुपयांची रक्कम संबधितांनी घेतली होती. सायबर पोलिसांना जालंधर येथील एका खात्यात ही रक्कम गेल्याची माहिती मिळाली. हे खाते गोठवून त्यातील १७ लाखांची रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले.

ऑनलाईन फसवणुकीत सायबर पोलिसांनी गेलेली रक्कम परत मिळविण्यात यश मिळाले असले तरी या घटनांमधील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. सायबर चोरटे अनेक प्रकारच्या व्हिपीएनचा वापर करत असून, अनेक गुन्हेगार हे परराज्यातील असल्याने त्यांना ओळखणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Previous Post

आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी कमकुवत राहणार !

Next Post

मोलकरणीचा प्रताप : डॉक्टरांच्या घरात मारला लाखो रुपयांचा डल्ला !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

मोलकरणीचा प्रताप : डॉक्टरांच्या घरात मारला लाखो रुपयांचा डल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group