Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सत्ताधारी महायुतीमध्ये उडू लागले खटके : भाजपच्या आमदाराने सुपारी घेतली ?
    राजकारण

    सत्ताधारी महायुतीमध्ये उडू लागले खटके : भाजपच्या आमदाराने सुपारी घेतली ?

    editor deskBy editor deskDecember 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यामध्ये खटके उडू लागले आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून आता सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत खटके उडण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. त्याच मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. बीडमधील सर्वच आमदारांनी यासंबंधी वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे. यात भाजप आमदार सुरेश धस यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही निशाणा साधला.

    अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचे पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत.

    संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरु केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडे यांची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.