Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर तालुक्यात बिबट्या मादीचा मृत्यू
    क्राईम

    जामनेर तालुक्यात बिबट्या मादीचा मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील तोंडापूर-वाकोद रस्त्यावरील तोंडापूरपासून चार किलोमीटर अंतरावर भारुडखेडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला बिबट्या मादी गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत सापडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, तोंडापूर-भारुडखेडे रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या शेताच्या बंधाऱ्यात ती पडून होती. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठी गर्दी जमली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी हजर झाले. पंचनामा करून मृत मादी बिबट्याला जामनेर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

    पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे व त्यांच्या टीममार्फत शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याचे वय ३ वर्षे असून, तो बिबट्या विद्युत तारेच्या प्रवाहाच्या धक्क्याने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचेही निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वनविभाग, जळगाव यांच्यामार्फत सुरू आहे.

    यावेळी वनविभागाचे वनसंरक्षण अधिकारी (जळगाव) उमेश बिराजदार, मानद वन्यजीव अधिकारी रवींद्र फालक, वनपरिक्षेत्र अधिकारी (जामनेर) सचिन जाधव, गोद्री येथील वनपाल समाधान धनवट, जामनेर येथील वनपाल प्रशांत पाटील, वनरक्षक मोनिका कांबळे, मंगेश निकुंभ, कुणाल जाधव यांनी मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “भोंदू अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; नरबळीचा संशय, न्यायालयात खळबळ”

    March 24, 2026

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.