Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुळे एसीबीची कारवाई : दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तिघांना अटक
    क्राईम

    धुळे एसीबीची कारवाई : दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तिघांना अटक

    editor deskBy editor deskDecember 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपीक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच राजेंद्र महादू मोरे (५७), ग्रामपंचायत लिपीक शांताराम तुकाराम बोरसे (५०) व पंटर सुरेश सोनू ठेंगे (४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ७० वर्षीय तक्रारदार यांची बहाळ रथाचे, ता. चाळीसगाव येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायत, बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे याने तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कुठलाही त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्याने मोरे याने १० लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत पाच लाखांवर तडजोड झाली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे गुरुवारी दुपारी मोरे याच्या घरात पंटर देंगे याने पैसे घेताच त्याला अटक करण्यात आली. नंतर मोरे व लिपीक बोरसे यांना अटक करण्यात आली.

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.